Header Ads

ad728
  • Breaking News

    एकशिव येथील वॉटर सप्लाय च्या डीपीचा प्रश्न किरण साठे यांनी मार्गी लावला


    एकशिव येथील वॉटर सप्लाय च्या डीपीचा प्रश्न किरण साठे यांनी लावला मार्गी
    अकलूज (प्रतिनिधी )
    माळशिरस तालुक्यातील एकशिव गावतील वॉटर सप्लाय च्या विजेचा डीपी जळाला होता,त्यासंदर्भात एकशिव येथील निकेतन साळवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांना १९ मे ला फोनवरून समस्या सांगितली व गावामध्ये पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली असून सर्वसामान्य जनतेला पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे सांगून पाणी टंचाई मोठया प्रमाणावर झाल्याचेही सांगितले होते.

    राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस यांनी तात्काळ महाराष्ट्र राज्य विजवितरण कंपनी अकलूजचे कार्यकारी अभियंता श्री जाधव यांना निवेदन देऊन एकशिव येथील वॉटर सप्लायचा विजेचा डीपी बसविण्यात यावा अशी मागणी केली होती,कार्यकारी अभियंता श्री जाधव साहेब यांनी संबंधित अधिकारी यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते.
    संबंधित मागणीचा पाठपुरावाही किरण साठे यांनीच केला आणि दिनांक २२ मे रोजी एकशिव गावामध्ये वॉटर सप्लाय चा डीपी बसविण्यात आला असल्याने एकशिव गावातील सर्वसामान्य जनतेने किरण साठे यांचे आभार मानले आहेत.

    चौकट----
    माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर मी नेहमीच आवाज उठवत असतो,एकशिव येथील ग्रामस्थांनी माझ्याकडे समस्या मांडल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा करून संबंधित अधिकारी यांच्याकडे वारंवार विचारणा करून जनतेला अडचणी निर्माण होणारा नाहीत याची खबरदारी घेतली,आणि 
    तीन दिवसांत एकशिव येथील वॉटर सप्लाय चा विजेचा डीपी बसविण्यास संबंधित अधिकारी यांना भाग पाडले,त्याच पद्धतीने माझ्या मागणीचा सकारात्मक विचार केल्याने मी वीज वितरण कंपनी अकलूज चे कार्यकारी अभियंता व त्याच्या अधिकारी वर्गाचेचेही आभार मानतो,आणि इथून पुढेही माळशिरस तालुक्यातील जनतेची सेवा करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.

    किरण साठे--सरचिटणीस--सोलापूर जिल्हा--राष्ट्रवादी काँग्रेस
    अध्यक्ष--बहुजन ब्रिगेड

    No comments