Header Ads

ad728
  • Breaking News

    रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या आमदारकी मुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार


    अकलूज (गणेश जाधव )     :- विधान परिषदेवर भारतीय जनता पार्टी कडून जे चार उमेदवार उभे करण्यात आले,  त्यात नव्या ना संधी देण्यात आली.अनेक बड्या नेत्यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी, म्हणून प्रयत्न केले,  परंतु केंद्रीय नेतृत्वाने वेगळाच पवित्रा घेऊन ज्यांनी विधानसभा लोकसभा अशा निवडणुकात मनापासून मदत केली व व ज्यांनी भाजपला मतदान रुपी दान देऊन देऊन भरगोस मतानी उमेदवारही निवडून आणले,त्यांना प्राधान्य देण्यात आले.  सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस वकाँग्रेस यांचे प्राबल्य असलेले बालेकिल्ले त्याला सुरुंग लावण्याचे काम दुसऱ्या फळीतील धडाडीचे युवा नेते रणजीत रणजीत सिंह मोहिते-पाटील व विजयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी मनापासून केल्याने, तसेच माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सव्वा लाख मतांचे माळशिरस तालुक्यातून आघाडी देऊन निवडून आणून भाजपच्या खासदारकितभर टाकली,  केंद्रात भाजप सत्तेतआले,  परंतु राज्यात मात्र हाती मोठे संख्याबळ असूनही सरकारस्थापन करता आले नाही .                     भाजपा चे नवनियुक्त आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी  सन 1995 साली विजय प्रताप युवा मंच च्या माध्यमातून समाजकारणव  राजकारणात सक्रिय होऊन राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली, तेव्हा राष्ट्रवादी आणी काँग्रेस यांची आघाडी होती. त्यावेळी युवक अध्यक्ष म्हणून रणजीत सिंह मोहिते पाटील यांनी आपला ठसा उमटवला, त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडल्या,  पण यातूनच नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. ती म्हणजे सन 1999 शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली,  व जून 99 लारणजीत सिंह मोहिते-पाटील यांच्यातील माणसे जोडण्याची कला  पाहून त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष करण्यात आले. व यातूनच रणजीत सिंह यांच्या राजकारणाच्या कक्षा वाढत गेल्या. त्यातूनच त्यांनी पाणी आडवा पाणी जिरवा या योजनेला गती देऊन, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून ही चळवळ रुजवली. आणि पाण्याचे नियोजन तयार झाले,  त्यानंतर 2009 ला राज्यसभेवर सदस्य म्हणून गेले, पण यातूनच शह-काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली,  त्याचा फटकासोलापूर  जिल्ह्यातील मोहिते-पाटील घराण्याला बसला,  परंतु हे घराणे न अडकता न डगमगता सामाजिक राजकीय कार्यात सक्रिय राहिले,  त्यानंतर त्यांनी आपले काम चालूच ठेवले,  दहा वर्षानंतर पुन्हा माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील हे राजकारणात सक्रिय होऊ लागले आहेत.                           राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच चंद्रकांत पाटील व इतर नेत्यांनी या दोन्ही नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न चालू केला, त्यातूनच 20 मार्च 2019 ला रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपातप्रवेश केला, पुढे खासदारकीच्या निवडणुका जाहीर झाल्या, फलटण चे रणजीत सिंह निंबाळकर यांना भाजपने माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील यांनी भाजपा च्या जुन्या नेत्यांना बरोबर घेऊन मोठ्या मताधिक्याने रणजीत निंबाळकर यांना निवडून आणले. कालांतराने विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या,  व राखीव असलेल्या माळशिरस मतदारसंघातून अभाविप तसेच संघाच्या कुशीत तयार झालेला कामगार वर्गातील उमदा असा तरुण नवा चेहरा या मतदारसंघात भाजपने दिला. त्यानंतर मोहिते पाटील कुटुंबातील ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील, पंचायत समितीचे उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, अकलूज ग्रामपंचायत चे सरपंच शिवतेजसिंह मोहिते पाटील 
    तसेच भाजपा चे सोपानराव नारनवर, निमगाव चे के. के. पाटील, माळशिरस च्या संजीवनी पाटील, राजकुमार पाटील, बाळासाहेब सरगर तसेच तालुक्यातील सर्व कार्यकर्ते यांनी माळशिरस तालुका अक्षरशः पिंजून काढून, गावोगावी बैठका घेऊन, विद्यमान आमदार राम  सातपुते यांना भरघोस मतांनी निवडून दिले, सध्या राज्यात भाजपा ची सत्ता नसली तरी, केंद्रात सत्ता आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील भाजपा चे दोन्ही आमदार विकास कामे खेचून आणून मतदार संघाचा विकास करतील, यात तिळमात्र शंका नाही. या दोन्ही आमदारा मुळे कृष्णा भीमा स्थिरीकरण हा प्रकल्प तसेच अनेक वर्षापासून रेंगाळलेला पंढरपूर लोणंद हा रेल्वे मार्ग, यासाठी त्यांना आपली ताकद पणाला लावावी लागणार आहे. या दोघांमुळे माळशिरस तालुक्याच्या आर्थिक विकासाला निश्चित पणे गती मिळणार आहे. तसेच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार आहेत.                          पूर्वी सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस चा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु मोहिते पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर     आता      सोलापूर जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीचे निर्विवाद पणे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. भाजपाचे जिल्ह्याला सहयोगी सदस्य म्हणून दुसऱ्या फळीतील समाजातील प्रश्नाची जाण असलेला नेता प्रशांत परिचारक तसेच बार्शीचे राजाभाऊ राऊत हे सहयोगी आमदार असले तरी पक्षाचे म्हणून आमदार विजयकुमार देशमुख,  आमदार सुभाष देशमुख तसेच कल्याण शेट्टी व रणजीत निंबाळकर यांच्या जोडीला खासदार म्हणून डॉक्टर जय सिद्धेश्वर स्वामी असे मातब्बर नेते लाभलेले आहेत,  या सर्वाना बरोबर घेऊन  पुन्हा एकदा जिल्ह्यात मोहिते-पाटील गट हा सक्रिय झाला आहे. 
    :भाजपा चे विधानपरिषद चे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणी विधानसभा चे आमदार राम सातपुते या जोडी मुळे माळशिरस तालुका हा भाजपमय झाला असून, त्याचा फायदा माळशिरस तालुक्यातील नागरिकांना निश्चित पणे होणार आहे.

    No comments