Header Ads

ad728
  • Breaking News

    रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपा कडून उमेदवारी जाहीर


    अकलूज (प्रतिनिधी ) भाजपकडून विधानपरिषदेसाठी माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचे नाव अंतिम केले आहे. राज्यातील होणाऱ्या विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने चार उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यामध्ये रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या नावाचा 
    समावेश आहे. मोहिते-पाटील यांच्या समावेशाने भाजपने अखेर त्यांना न्याय दिल्याची भावना त्यांच्या समर्थकांमध्ये व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी माजी खासदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्याच वेळी त्यांचे वडील माजी
    खासदार विजयसिंह मोहिते-पाटील हे मात्र भाजपमध्ये आले नव्हते, 

    लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जंगी सभा अकलूज मध्ये घेतली होते. त्यावेळी विजयसिंह मोहिते-पाटील पंतप्रधान मोदी यांच्या व्यासपीठावर उपस्थित होते. त्यानंतर माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस कडून खेचून आणण्यात मोहिते-पाटील यांनी 
    महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकसभेला एकट्या माळशिरस विधानसभा मतदारसंघातून एक लाखाच्या पुढे मताधिक्य खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मिळवून देण्यात मोहिते-पाटील यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्याची दखल भाजपने घेत रणजीतसिंह मोहिते पाटील 
    विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.


    सोलापूर जिल्ह्यात मोहिते-पाटील समर्थकांचे मोठे जाळे आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांच्या गटाचे कार्यकर्ते पहिल्यापासून सक्रिय आहेत.
                                                              

    त्यामुळे प्रत्येक तालुक्यात भाजप वाढीसाठी आता मदत होणार आहे. मोहिते-पाटील यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

    No comments