Header Ads

ad728
  • Breaking News

    दयाळ पक्षाने साकारले घरटे दुचाकीच्या डिकीट






    *'दयाळ' पक्ष्याने साकारले घरटे दुचाकी वाहनाच्या डिकीत.‌* (कोवीड-२९ लाॅकडाऊनचा परिणाम)

    अकलूज(प्रतिनिधी )सध्या लाॅकडाऊन मुळे माणूस घरी बंदिस्त झाल्याने त्याची वाहने गेली दीडमहिने जागेवरंच लाॅक होऊन बसले आहेत. त्यात चैत्र व वैशाख महिना म्हणजे बहुतांशी पक्ष्यांचा विणीचा काळ. या दिवसात माणसाच्या  सहवासाला जवळ करून राहणारे अनेक पक्षी माणसांनी वापरात नसलेल्या वाहनांच्या वळचणीच्या भागांमध्ये तसेच डिकी व आरशाच्या बेचक्यात घरटी बांधून आपल्या पिल्लावळींना जन्म घालण्याच्या कामाला सरसावल्याचे पाहायला मिळते. येथील रत्नपुरी भागात राहणारे प्रा. डॉ. विशाल साळुंखे यांचा निवासस्थानी भारतीय दयाळ (इंडियन राॅबिन) या पक्ष्याने त्यांच्या दुचाकी वाहनाच्या डिकीत  आपला प्रपंच थाटल्याचे आढळून आले आहे.
     ### पक्ष्यांतील तानसेन म्हणून ओळखला जाणारा हा पक्षी चिमणी एवढ्या आकाराचा असतो. यातील नर गडद  काळ्या रंगाचा असून त्याच्या पंखावर दोन्ही बाजूला पांढरं पट्टे असतात. मादी तांबूस रंगाचे असते. मनुष्य वस्तीत या पक्ष्यांना घरटी बनवायला आवडते. घराभोवतीच्या गचपणीत व भिंतीतील देवळीत नर मादी दोन्ही मिळून गवताच्या काड्या वापरून शिस्तबद्ध उथळ फुलपात्रासारखे घरटी तयार करतात. मादी त्यात चार-पाच अंडी ठेऊन उबवणीचे काम करते. अंड्यातून पिल्ले बाहेर आले की त्यांचे संगोपन मात्र नर दयाळ पक्षी करतो. 
     ### सध्या कोरोना विषाणूमुळे लाॅकडाऊन लागू केल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून दुचाकी व चारचाकी वाहने घरातील जागेवर थांबून आहेत. या अचल वाहनांच्या डिकीत, आरसाच्या बेचक्यात व  सुरक्षित वाटणाऱ्या अन्य भागांमध्ये दयाळ सह लालबुड्या बुलबुल, ब्राह्मणी मैना, घरचिमणी या सारख्या चिमुकल्या पक्ष्यांनी वीण घालण्यासाठी सरसावल्याचे पाहायला मिळते. 🔵
     
      *चौकट*  
     ~~~लाॅकडाऊनमुळे गेल्या दीड महिन्यापासून  आम्हाला बाहेर पडता आले नाही; त्यामुळे माझ्या निवासस्थानी आम्ही वापरत असलेली स्कूटी ही दुचाकी वाहन जागेवरच उभी आहे. या वाहनाच्या डिकीत दयाळ पक्ष्यांचे घरटं व  त्यात पिल्ले दिसले. तेव्हापासून आम्ही त्या पक्षी व पिल्लांकडे लक्ष देवून त्यांची पूर्ण वाढ होण्याची काळजी घेतो. 
     *प्रा.डाॅ. विशाल साळुंखे, अकलूज*. 
     ~~~ लाॅकडाऊन मुळे  माणूस घरीच स्थानबद्ध होऊन बसला आहे. माणसाच्या वावरावर आळा बसल्यामुळे प्रदूषणावर नियंत्रण बसले आहे. त्यामुळे अनेक पक्षी मनुष्य वसतीला जवळीकता साधन त्याच्या वापरात नसणाऱ्या वाहनांच्या भागांमध्ये सुरक्षित जागा शोधून आपल्या वंशाभिवृद्धीचा कामात गुंतलेले आढळणे म्हणजे निसर्गाचे आरोग्य सुधारल्याची प्रचीती होय. 
     - *डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी अभ्यासक*

    No comments